राफेल नदालचा युएस ओपनच्या उपांत्य फेरीत प्रवेश

न्युयॉर्क। जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असणारा स्पेनचा टेनिसपटू राफेल नदाल युएस ओपनच्या पुरूष एकेरीत उपांत्य फेरीत पोहचला आहे. त्याने उपांत्यपूर्व फेरीत डॉमिनिक थिमला 0-6, 6-4, 7-5, 6-7(4-7), 7-6(7-5) अस पराभूत केले.

आर्थर अॅशे स्टेडियमवर झालेला हा सामना पहाटे दोन वाजता संपला. तसेच हा सामना सुमारे चार तास 49 मिनिटे चालला.

युएस ओपनच्या इतिहासातील नदालचा हा पहिलाच पाच सेटचा सामना ठरला आहे. तसेच तो 2006 पासून युएस ओपनच्या उपांत्यपूर्व सामना एकदाही पराभूत झालेला नाही.

यावेळी थिमने पहिला सेट अवघ्या 24 मिनिटांमध्येच जिंकला. यामध्ये नदालने हा सेट 0-6 असा गमावला असून असे त्याच्या बाबतीत चौथ्यांदा घडले आहे. तसेच त्या सामन्यांमध्ये तो पराभूतही झाला आहे.

थिम हा असा एकच टेनिसपटू आहे ज्याने नदालला मागील दोन हंगामात क्ले कोर्टवर पराभूत केले आहे. यावेळी थिमने 74 तर नदालने 55 विजयी फटकार मारले. तर नदालने 165 तर थिमने 171 गुण मिळवले.

मात्र नंतरच्या चार सेटमध्ये ऑस्ट्रेलियाच्या या 24 वर्षीय टेनिसपटूने अनेक अनफोर्स्ड एरर (स्वत:हच्या चुकीने प्रतिस्पर्धी खेळाडूला गुण मिळणे)  केले. तर नदालने या स्टेडियमवरच्या उष्ण वातावरणात चांगला खेळ केला. यावेळी थिमने 57 तर नदालने 49 अनफोर्स्ड एरर केले.

32वर्षीय नदाल 2018च्या महत्त्वाच्या स्पर्धेमध्ये पहिल्या आठमध्ये राहिला आहे. त्याने थिमला यावर्षीच रोलॅंड गॅरोसच्या(फ्रेंच ओपन) अंतिम सामन्यात पराभूत करून त्याचे 17 वे ग्रॅंड स्लॅम जिंकले होते.

8 सप्टेंबरला होणाऱ्या उपांत्य सामन्यात गतविजेता नदाल जुआन मार्टीन डेल पोट्रोशी भिडणार आहे. हे दोघेही 2017युएस ओपनच्या उपांत्य सामन्यात समोरा समोर आले होते. यावेळी नदालने 4-6, 6-0, 6-3, 6-2 असा विजय मिळवला होता.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

वृद्धिमान सहाने ट्विट केलेल्या गमतीशीर फोटोवर स्टीव्ह स्मिथने दिली अशी प्रतिक्रिया…

रोनाल्डोच्या जाण्याने रियल माद्रीदचा संघ कमकुवत झाला आहे- मेस्सी