उसेन बोल्टचे अचंबित करणारे रेकॉर्डस्

उसेन बोल्ट हा या जगात केवळ धावण्यासाठी आला होता असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्याच्या पदकांची संख्या पहाता एखाद्याला गरगरून जाणे स्वाभाविक आहे. ‘पृथ्वीतलवारचा सर्वात वेगवान धावपटू’ असा किताब मिळवणारा हा जमैकाचा धावपटू आपल्या अनेक विश्वविक्रमांसाठी प्रसिद्ध आहे.

पाहूयात काय आहेत बोल्टचे अचंबित करणारे विक्रम:

१. १०० मीटर, २०० मीटर आणि ४*१०० रिले शर्यतीत विश्वविक्रम प्रस्थापित करणारा एकमेव खेळाडू.

१०० मीटर – ९.५८ सेकंद
२०० मीटर – १९.१९ सेकंद
४*१०० मीटर रिले – ३६.८४

२. बोल्टचा धावण्याचा वेग – ४४ किलोमीटर प्रति तास इतका आहे.
(सर्वसाधारण माणसाचा वेग २८-३० किलोमीटर प्रति तास)

३. १०० मीटर अंतर ओलांडण्यासाठी बोल्ट केवळ ४१ पाऊलं टाकतो.
(सर्वसाधारण माणूस ५०-५२ पाऊलं टाकतो)

४. आयएएफएफ ऍथलेट ऑफ द इयर पुरस्कार विक्रमी ६ वेळा पटकावला आहे.

५. ११ वेळा विश्वविजेता आणि ९ वेळा ऑलम्पिक विजेता अशी बोल्टची ख्याती आहे.

६. २००८, २०१२, २०१६ या सर्व ऑलम्पिक स्पर्धांमध्ये त्याने सर्व प्रकारात (१००,२००,४*१०० मीटर) सलग ३ वेळा सुवर्णपदक पटकावण्याचा मान मिळवला आहे आणि हे करणारा तो एकमेव धावपटू ठरला आहे.

७. ‘फोर्ब्सच्या’ यादीत सर्वात जास्त रक्कम मिळवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत बोल्टचा २३ वा क्रमांक आहे.

८. उसेन बोल्ट सोसिअल माध्यमांवर देखील अग्रेसर आहे त्याला फेसबुकवर तब्बल १ कोटी ९३ लाख लोक फॉलो करतात तर ट्विटर आणि इंस्टाग्रामवर देखील हा आकडा ७० लाखांच्या घरात जातो.