विराट कोहलीने दिल्या उसेन बोल्टला शुभेच्छा

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने विश्वातील सर्वात वेगवान धावपटू उसेन बोल्टला त्याच्या कारकिर्दीतील शेवटच्या शर्यतीसाठी विशेष शुभेच्छा दिल्या.

पृथ्वीतलावरचा सर्वात वेगवान धावपटू आणि १०० मीटर व २०० मीटर विश्वविक्रमाचा मानकरी असलेला उसेन बोल्ट, लंडनमध्ये होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पिअन्सशिप मध्ये शुक्रवारी आपल्या अविस्मरणीय कारकीर्दीतील शेवटची शर्यत धावणार आहे.

या शर्यतीसाठी त्याच्यावर जगभरातून शुभेच्छा मिळत आहेत.

ट्विटर वर तर #ForeverFastest असा हॅशटॅग देखील सध्या ट्रेंडिंग आहे.

उसेन बोल्टला विराट कोहलीने ट्विटरवर शुभेच्छा देण्यासाठी एक विडिओ टाकला आहे.

पहा हा ट्विट: