वेगाचा बादशहा उसेन बोल्टची फुटबॉलमध्येही चमकदार कामगिरी

जमैकाचा माजी स्टार धावपटू उसेन बोल्टने ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या ए लीगमध्ये सेंट्रल कोस्ट मरिनर्सकडून खेळताना दोन गोल केले आहे. मॅकार्थर साउथ वेस्ट युनायटेड विरुद्ध झालेला हा सामना मरिनर्सने 4-0 असा जिंकला.

जागतिक स्तरावरील उत्कृष्ठ धावपटू बोल्टला फुटबॉलच्या नेटमध्ये सुरूवातील हवे तेवढे यश आले नव्हते. पण आजच्या सामन्यात त्याने गोल करत चाहत्यांना चांगलेच खुष केले.

सामन्याच्या 55व्या मिनिटाला बोल्टने त्याच्या कारकिर्दीतील पहिला गोल केल्यावर त्याने त्याच्या प्रसिद्ध शैलीत आनंद व्यक्त केला.

दुसरा गोल बोल्टने 69व्या मिनिटाला केला. यामुळे दोन गोल करत तो हॅट्ट्रीक करण्याच्या मार्गावर होता. पण यामध्ये त्याला अपयश आले.

ऑलिंपिकमध्ये आठ सुवर्ण पदक जिंकणाऱ्या बोल्टने युनायटेड विरुद्धच्या सामन्यात 75 मिनिटे खेळताना दोन गोल बरोबरच दोन पास केले तर सहा पैकी तीन वेळा टारगेटवर शॉट केले.

या सामन्यात मरिनर्सकडून पहिला सामना खेळणाऱ्या रॉस मॅकॉरकॅनेही पहिला गोल करत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.

कोस्ट बरोबर करार केल्यावर बोल्टने त्याचा पहिला सामना 31 ऑगस्टला खेळला होता यावेळी तो फक्त 20 मिनिटे खेळला होता. तर 19 सप्टेंबरला नॉर्थ शोर मरिनर्स विरुद्धच्या सामन्यात पूर्ण दुसरे सत्र खेळला होता.

पहिल्या सामन्यात फक्त 20 मिनिटे खेळून झाल्यावर थकलेल्या बोल्टने विश्रांती घेतली होती. पण त्याने पूर्ण 90 मिनिटांच्या सामन्यासाठी फिट राहण्याचा प्रयत्न करत त्यात प्रगती केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

प्रो कबड्डीत असा पराक्रम करणारा रिशांक देवडिगा ठरला महाराष्ट्राचा दुसरा खेळाडू

कर्णधार विराट कोहलीला बीसीसीआयकडून मोठा धक्का

मेस्सीच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वांत मोठी खुषखबर….