पहा नक्की काय झाले उसेन बोल्टला कारकिर्दीतील अखेरच्या सामन्यात

जगातील अॅथलेटिक्स मधील सार्वकालीन महान खेळाडू उसेन बोल्टच्या कारकिर्दीचा शेवट अपेक्षेप्रमाणे गोड झाला नाही. काल वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पिअनशिपमध्ये १*४०० मीटर रिले स्पर्धा पार पडली. या स्पर्धेचे वैशिष्ठय म्हणजे जमैका संघाकडून शर्यत संपवणारा उसेन बोल्टने काल लंडनच्या ऑलिम्पिक स्टेडियममध्ये आपल्या ऐतिहासिक कारकिर्दीला पूर्णविराम दिला.

परंतु हा पूर्णविराम दुर्दैवी होता. शेवटच्या टप्प्यात जेव्हा बॅटन बोल्टकडे आले तेव्हा तो काही मीटर धावल्यानंतर दुखापतग्रस्त झाला आणि कारकिर्दीचा शेवट गोड करण्यापासून मुकला.

उसेन बोल्टची वैयक्तिक १०० मीटर शर्यत चर्चेची ठरली होती मात्र त्याला म्हणावा तास निरोप मिळाला नाही. कांस्य पदकावर समाधान मानावे लागल्यामुळे अनेक बोल्ट चाहते नाराज झाले होते. बोल्टला आधीच्या चुका सुधारून पुन्हा एकदा सुवर्ण पदक मिळवण्याची तसेच चाहत्यांना खुश करण्याची संधी होती. परंतु तो दुखापतग्रस्त झाल्यामुळे ती हुकली.

पहा संपूर्ण विडिओ:

दुसरा विडिओ: