मेलबर्न कसोटीत खेळत असेल्या खेळाडूच्या भावाला अटक

मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात तिसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात खेळत असलेला ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज उस्मान ख्वाजाचा भाऊ अर्सेनल ख्वाजाला पुन्हा एकदा अटक करण्यात आली आहे.

त्याच्यावर जामीनाच्या नियमांचे उल्लंघन करणे, साक्षीदारावर दबाव टाकण्याच्या आरोप आहेत. त्यामुळे त्याला पुन्हा अटक करण्यात आली आहे. याआधीच अर्सेनलवर त्याच्या साथीदाराला दहशतवादी षडयंत्रात फसवण्याचा आरोप आहे. या आरोपामुळे त्याला आधी अटक झाली होती. पण डिसेंबरच्या सुरुवातीला त्याला जामीनावर सोडण्यात आले होते.

याबद्दल न्यू साउथ वेल्सच्या महिला पोलिसने सांगितले की, ’39 वर्षीय अर्सेनलला परत अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर जामीनाच्या नियमांचे उल्लंघन करणे आणि न्यायालयीन प्रक्रियेत साक्षीदारांवर प्रभाव पाडणे हे आरोप आहेत. त्याला आता जामीन देण्यासाठी नकार देण्यात आलेला आहे.’

याआधी अर्सेनलवर आरोप होता की ट्रायअँगल लव प्रकरणात त्याने कथित दहशतवादी षड्यंत्र रचताना त्याच्या साथीदाराला फसवण्याचा प्रयत्न केला होता.

या आरोपाबद्दल पोलिस प्रवक्ताने सांगितले की या वर्षाच्या सुरुवातीला न्यू साउथ वेल्स यूनिवर्सिटीच्या लायब्रेरीमध्ये पोलिसांना एक पत्र मिळाले होते, ज्यात प्रधानमंत्री मैल्कम टर्नबुल यांना मारण्याची योजना लिहिली होती.

या प्रकरणात श्रीलंकेच्या मोहम्मद निजामुद्दीनला अटक करण्यात आली होती. पण त्याचे अक्षर त्या पत्राशी जूळत नसल्याने सप्टेंबरमध्ये त्याच्यावरील सर्व आरोप हटवण्यात आले होते.

निजामुद्दीन ज्या विभागात काम करतो त्याच विभागात अर्सेनलही काम करतो. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या अधिकारीने सांगितले की अर्सेनलचे त्याची प्रेयसीबरोबर वाद झाले होते. त्यामुळे त्याने निजामुद्दीनला फसवण्याचा कट रचला असावा, या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

रिषभ पंतने केला टीम पेनचा कालचा हिशोब चुकता, पहा व्हिडीओ

जगातील सर्वच कर्णधारांसाठी हे वर्ष ठरले अतिशय खराब

रोहितचा नादच खुळा! या कारणामुळे आहे टीम इंडियासाठी लकी