राष्ट्रीय फाइव्ह अ साइड हॉकी स्पर्धेत महाराष्ट्राचा महिला संघ उत्तरप्रदेशकडून ६-५ असा पराभूत

पुणे । येथे सुरु असलेल्या दुसऱ्या हॉकी इंडिया ५ अ साइड सिनियर स्पर्धेत पहिला दिवस महाराष्ट्रासाठी संमिश्र ठरला. पुरुषांच्या संघाने ५-० असा विजय मिळवताना महिला संघाला मात्र पराभवाला सामोरे जावे लागले.

ही स्पर्धा पुण्यातील बालेवाडी स्टेडियम येथे सुरु आहे. पहिल्याच दिवशी महिलांच्या ८ संघांनी ४ सामन्यात तब्बल ४३ गोल केले.

स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात हरियाणाच्या महिला संघाने तामिळनाडू संघाचा अ गटात १८-२ असा मोठा पराभव केला तर दुसऱ्या सामन्यात ओडिशा संघाने कर्नाटकचा ३-१ असा पराभव केला.

दिवसातील तिसऱ्या सामन्यात पंजाबच्या महिला संघाने झारखंड संघाचा ५-३ असा पराभव केला.

अतिशय चुरशीच्या सामन्यात उत्तर प्रदेश महिला संघाने महाराष्ट्र संघाचा ६-५ असा पराभव केला.