रवी शास्त्री आहेत जगातील सर्वात महागडे प्रशिक्षक

रवी शास्त्री हे जगातील सर्वात महागडे क्रिकेट प्रशिक्षक आहेत. ते वर्षाला १.१७ मिलियन डॉलर मानधन घेतात.

हे मानधन ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि भारतातील काही आघडीच्या खेळाडूंपॆक्षा थोडेच कमी आहे.

खेळाडूंपेक्षा प्रशिक्षकाला जास्त मानधन देण्याची एकप्रकारची प्रथाच आशिया खंडात आहे. चंडिका हथुरासिंघा या बांगलादेशच्या प्रशिक्षकाला त्यांच्या मुख्य खेळाडूंपेक्षा ५ पट जास्त मानधन देते.

पाकिस्तानचे प्रशिक्षक असणाऱ्या मिकी आर्थर यांना पाकिस्तानच्या टॉप खेळाडूंपेक्षा ३ पट जास्त मानधन मिळते. श्रीलंकेचे ग्रॅहम फोर्ड जे पूर्णवेळ प्रशिक्षक राहिले त्यांनाही लंकेच्या मुख्य खेळाडूंपेक्षा २ पट जास्त मानधन दिले जात होते.

आशिया खंडात खेळाडूंची कधीही उचलबांगडी होत असल्यामुळे आशियाबाहेरील प्रशिक्षकाला आकर्षित करण्यासाठी एवढे मोठे मानधन दिले जाते.

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड देशात त्यांच्या प्रशिक्षकाला टॉप खेळाडूंच्या अर्धेच मानधन दिले जाते.

प्रशिक्षक आणि त्यांचे मानधन (मिलियन डॉलर)

१.१७ रवी शास्त्री (भारत)
०.५५ डॅरेन लेहमन (ऑस्ट्रेलिया)
०.५२ ट्रेवर बायलीस (इंग्लंड)
०.३४ चंडिका हथुरासिंघा (बांगलादेश)
०.२५ माईक हेसन (न्यूजीलँड)
०.२२ मिकी आर्थर (पाकिस्तान)
०.१४ निक पोथास (श्रीलंका )
०.०९ रुसेल डेमिंगो (दक्षिण आफ्रिका )