आयपीएल लिलावातील एवढे पैसे पाहुन त्या खेळाडूला आले टेन्शन

मंगळवारी(18 डिसेंबर) आयपीएल 2019 चा लिलाव जयपूर येथे पार पडला आहे. या लिलावात प्रत्येक संघाने देशांतर्गत क्रिकेट गाजवलेल्या युवा खेळाडूंवर मोठी बोली लावण्याला पसंती दिली आहे.

यामध्ये तमिळनाडूचा फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीचाही समावेश आहे. तो जयदेव उनाडकटसह संयुक्तरित्या यावर्षीच्या आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याला किंग्ज इलेव्हन पंजाबने 8 कोटी 40 लाख रुपयांची बोली लावत संघात सामील करुन घेतले आहे.

तो यावर्षी अनकॅप(एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेला खेळाडू) खेळाडूंमध्येही सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.

त्याच्यावर लावलेल्या या बोलीनंतर भावना व्यक्त करताना वरूण द हिंदूने दिलेल्या वृत्तानुसार म्हणाला की ‘मी लिलाव माझ्या पालकांबरोबर, बहिणीबरोबर आणि आजी-आजोबांबरोबर पाहत होतो. माझे नाव जेव्हा आले तेव्हा मी नर्व्हस झालो होतो.’

‘मी थोडा घाबरलो होतो. मी विचारही केला नव्हता की मला एवढी रक्कम मिळेल. पण त्यानंतर मला संघासाठी चांगली कामगिरी करण्यासाठी असलेल्या जबाबदारीची जाणीव झाली.’

वयाच्या 13 व्या वर्षी यष्टीरक्षक फलंदाज म्हणून क्रिकेटला सुरुवात केलेल्या वरुणने नंतर आर्किटेक्चरमध्ये शिक्षण घेण्यासाठी क्रिकेटमधून ब्रेक घेतला. त्यानंतर त्याला घुडघ्याची दुखापत झाली त्यामुळे त्याने फिरकी गोलंदाजी करणे पसंत केले.

तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये तमिळनाडू संघाकडून खेळत असून त्याने याचवर्षी रणजी ट्रॉफीमध्येही पदार्पण केले आहे. त्याने हैद्राबाद विरुद्ध रणजी सामना खेळताना 1 विकेट घेतली होती.

तसेच त्याने अ दर्जाचे 9 सामने खेळले असून यात त्याने 22 विकेट्स घेतल्या आहेत. या सर्व विकेट्स त्याने यावर्षीच्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत घेतल्या होत्या. तसेच तो यावर्षीच्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला होता.

त्याचबरोबर त्याने तमिळनाडू प्रिमियर लीगमध्ये उत्तम कामगिरी झाली आहे. त्याने या स्पर्धेत 9 विकेट्स घेतल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या:

७ तासांत आयपीएलमध्ये १०६ कोटींची उधळणं

माझं धोनीबद्दलचं मत कधीच बदलणार नाही- गौतम गंभीर

भारत जर २०१९ विश्वचषक जिंकला तर कपील देव शर्टलेस धावणार…

माझं काय चुकलं सांगा, आयपीएलमध्ये स्थान न मिळालेल्या खेळाडूचा त्रागा