दुसऱ्या श्री.शरदचंद्रजी पवार प्रौढ करंडक  क्रिकेट स्पर्धेत वसंत रांजणे इलेव्हन संघाचा मोठा विजय 

पुणे | साई9स्पोर्ट्स यांच्या तर्फे दुसऱ्या श्री.शरदचंद्रजी पवार प्रौढ करंडक  क्रिकेट स्पर्धेत वसंत रांजणे इलेव्हन संघाने डी.बी. देवधर एलेव्हन संघाचा 8 गडी राखून दणदणीत पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.

नेहरू स्टेडीयम क्रिकेट मैदानावर झालेल्या सामन्यात सचिन सामलच्या नाबाद 36 धावांच्या बळावर वसंत रांजणे इलेव्हन संघाने डी.बी. देवधर एलेव्हन संघाचा 8 गडी राखून दणदणीत पराभव केला. पहिल्यांदा खेळताना पराग चितळे ,सुभाष रांजणे, मोहन जाधव व विवेक मालशे यांच्या अचूक गोलंदाजीने डी.बी. देवधर एलेव्हन संघाचा डाव 15 षटकात 6 बाद 74 धावांवर रोखला. अनंत नेरळकरच्या एकतर्फी 44 धावा संघाचा डाव भक्कम करू शकल्या नाहीत. 74 धावांचे लक्ष सचिन सामलच्या नाबाद 36 व  सनी मारवाडीच्या 19 धावांसह वसंत रांजणे इलेव्हन संघाने 3 चेंडू बाकी असताना 2 बाद 76 धावांसह सहज पुर्ण केले. 50 चेंडूत नाबाद 36 धावा करणारा सचिन सामल सामनावीर ठरला. 

स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी

डी.बी. देवधर एलेव्हन- 15 षटकात 6 बाद 74 धावा(अनंत नेरळकर 44, पराग चितळे 2-14, सुभाष रांजणे 1-12, मोहन जाधव 1-5, विवेक मालशे 1-23) पराभूत वि वसंत रांजणे इलेव्हन – 14.3 षटकात 2 बाद 76 धावा (सचिन सामल नाबाद 36, सनी मारवाडी 19, रोहुल कानडे नाबाद 5, पराग कानडे 1-17, करण थापा 1-14) सामनावीर- सचिन सामल

वसंत रांजणे इलेव्हन संघाने 8 गडी राखून सामना जिंकला.