भारताचे १५वे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू बॅडमिंटन चाहते…

भारताचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून व्यंकय्या नायडू यांची निवड झाली. त्यामुळे त्यांनी आजपर्यत कारकिर्दीत केलेल्या कामगिरीचा तसेच त्यांच्या कारकिर्दीचा  माध्यमांवर आढावा घेतला जात आहे.

परंतु बॅडमिंटन खेळणे ही गोष्टसुद्धा त्यांच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग राहिली आहे.  व्यंकय्या नायडू हे अगदी पहिल्यापासून बॅडमिंटन खेळतात आणि ते मोठे बॅडमिंटन चाहते आहेत ही गोष्ट बऱ्याच जणांना माहीतही नसेल. चेन्नई येथील बोट क्लबमध्ये जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते आपल्या जुन्या मित्रांबरोबर बॅडमिंटन खेळण्याचा आनंद घेत असतात.

२०१७ वर्षाची सुरुवात देखील त्यांनी बॅडमिंटन खेळानेच केली आहे. मंत्री आणि आधी खासदार असताना देखील ते दिल्ली येथे त्यांच्या घरासमोर बॅडमिंटन खेळत असत. त्यासाठी त्यांनी घरासमोरील गवतावरच बॅडमिंटन कोर्ट बनवलं आहे.

सोशल मीडियावर बॅडमिंटन खेळतानाचे असंख्य फोटो व्यंकय्या नायडू यांनी प्रसिद्ध केले आहेत.