कोहलीची टीम इंडिया २०२०च्या टी२० विश्वचषकात खेळणार या मैदानांवर

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आज २०२०च्या टी२० विश्वचषकाच्या मैदानांची घोषणा केली. ऑस्ट्रेलियामधील ८ शहरात १३ स्टेडियमवर या स्पर्धा होणार आहे.

पुरुष आणि महिलांच्या क्रिकेटच्या या कुंभमेळ्याच्या ठिकाणांची आज घोषणा झाली.महिलांचा टी२० विश्वचषक २१ फेब्रुवारी ते ८ मार्च या काळात होणार असून पुरुषांचा टी२० विश्वचषक १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या काळात होणार आहे.

पुरुष आणि महिलांचा विश्वचषक एकाच वर्षात वेगळ्या महिन्यांत एकाच देशात घेण्याची ही पहिलीच वेळ आहे.

ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न, सिडनी, पर्थ, ऍडलेड, ब्रिसबेन, होबार्ट, कॅनबेरा आणि गिलोन्ग या शहरात हे सामने होणार आहे. दोन्ही विश्वचषकांचे अंतिम सामने हे मेलबर्न येथे होणार आहेत.

पुरुषांच्या उपांत्यफेरीचे सामने हे सिडनी आणि ऍडलेड येथे तर महिलांचे सामने सिडनी येथे होणार आहे. या विश्वचषकात १६ संघ पुरुषांच्या गटात भाग घेणार असून सुपर १० ऐवजी सुपर १२ यावेळी खेळवला जाणार आहे.

पुरुषांचे क्रमवारीतील अव्वल ८ संघ या स्पर्धेला सरळ पात्र होणार असून बाकी संघ पात्रता फेरीतून येणार आहेत.

या स्पर्धेत महिलांचे १० संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेच्या तारखा लवकरच घोषित होणार आहे.