भारत-दक्षिण आफ्रिकामध्ये होणाऱ्या कसोटी सामन्यांच्या ठिकाणात बदल; पुण्यात होणार हा सामना

पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौरा 15 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर दरम्यान रंगणार आहे. या दौऱ्यात 3 टी20 आणि 3 कसोटी सामने होणार आहेत.

या दौऱ्यातील दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यांच्या ठिकाणात अदला-बदली झाली आहे. त्यामुळे आता 10 ते 14 ऑक्टोबर दरम्यान होणारा दुसरा कसोटी सामना रांची ऐवजी पुण्यात होणार आहे. तर 19 ते 23 ऑक्टोबर दरम्यान होणारा तिसरा कसोटी सामना पुण्याऐवजी रांचीत होणार आहे.

आयसीसीने दिलेल्या वृत्तानुसार दुसऱ्या कसोटीची तारखा आणि दुर्गा पूजा जवळपास एकाचवेळी येत असल्याने झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशनने बीसीसीआयकडे सामन्याचे ठिकाण बदण्याची विनंती केली होती.

एका रिपोर्टच्या नुसार सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयसाठी नेमुन दिलेल्या प्रशासकीय समितीने झारखंड क्रिकेट असोसिएशनची ही विनंती मान्य करताना शेवटच्या दोन कसोटी सामन्यांच्या ठिकाणात अदलाबदली केली आहे.

दक्षिण आफ्रिका या दौऱ्यात भारताविरुद्ध अनुक्रमे 15, 18 आणि 22 सप्टेंबरला तीन टी20 सामने खेळणार आहे. त्यानंतर 2 ऑक्टोबर पासून कसोटी मालिकेला सुरुवात होईल. पहिला कसोटी सामना विशाखापट्टणमला 2 ते 6 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्याचे वेळापत्रक – [फ्रिडम ट्रॉफी – 2019(भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका)] – 

टी20 मालिका

15 सप्टेंबर – पहिला टी20 सामना – धरमशाला

18 सप्टेंबर – दुसरा टी20 सामना – मोहाली

22 सप्टेंबर – तिसरा टी20 सामना – बंगळूरु

कसोटी मालिका-

2-6 ऑक्टोबर – पहिली कसोटी – विशाखापट्टणम

10-14 ऑक्टोबर – दुसरी कसोटी – पुणे

19-23 ऑक्टोबर – तिसरी कसोटी –रांची

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

लॉर्ड्सवर होणाऱ्या दुसऱ्या ऍशेस सामन्यासाठी असा आहे १२ जणांचा इंग्लंड संघ

टीम इंडियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी असा आहे वेस्ट इंडीजचा संघ

१२ वर्षांपुर्वी अनिल कुंबळेने कसोटीत केला होता अजब कारनामा