कोहली-पेन वाद हा खिलाडूवृत्तीला धरूनच – जोश हेजलवूड

पर्थ। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ऑप्टस स्टेडीयम, पर्थ येथे आज(18 डिसेंबर) दुसरा कसोटी सामना पार पडला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 146 धावांनी विजय मिळवत चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे.

‘या सामन्यात दोन संघांच्या कर्णधारांमध्ये ज्या शाब्दिक चकमकी झाल्या त्या खिलाडूवत्तीने झाल्या होत्या’, असे ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज जोश हेजलवूड म्हणाला.

झाले असे की ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात 71 वे षटक जसप्रीत बुमराह टाकत असताना टीम पेन आणि विराट कोहलीमध्ये हे संवाद सुरु झाले. पेन कोहलीला म्हणाला, ‘काल तू हरवला होतास, आज शांत रहायचा प्रयत्न कर.’ पण त्याचवेळी गॅफेनी यांनी त्यांना मधेच आडवत ‘आता हे बसं झाले’ असे बजावले.

या शाब्दिक चकमकीचा फायदा ऑस्ट्रेलिया संघाला अधिक झाला. कारण भारताच्या दुसऱ्या डावात विराट लवकरच बाद झाला. यामुळे विराट गोलदांजाच्या निशाण्यावर होता का याबद्दल हेजलवूड म्हणाला, ‘ऑस्ट्रेलिया एकाच खेळाडूला लक्ष्य करत नव्हती. तसेच विराट पेक्षा मला चेतेश्वर पुजाराची विकेट महत्त्वाची होती.’

‘पुजारा आणि अजिंक्य रहाणे या दोघांनी चेंडूंचा अधिक सामना केला आहे. तर या दोघांना आम्हाला लवकर बाद करायचे होते’, असेही हेजलवूड म्हणाला.

महत्त्वाच्या बातम्या:

किंग कोहलीच्या बाबतीत झाला कोणालाही नको असलेला योगोयोग

केएल राहुलला भारतात लवकर परतण्यासाठी चाहत्याने सुचवले हे विमान

जगातील सर्वात खराब स्वभाव असणाऱ्या खेळाडूंमध्ये विराट अव्वल