१५व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट २०१८-१९ स्पर्धेत व्हेरीटास, कॅपजेमिनि संघांची आगेकुच

पुणे। 2019 आयडीयाज्‌ अ सास कंपनी यांच्या तर्फे स्वर्गीय अंकुर जोगळेकर यांच्या स्मरणार्थ आयोजित 15व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत व्हेरीटास संघाने अॅटॉस्‌ संघाचा कॅपजेमिनि तर कॅपजेमिनि संघाने बीएमसी सॉफ्टवेअर संघाचा पराभव करत विजय मिळवला.

व्हिजन क्रिकेट अकादमी मौदानावर झालेल्या सामन्यात अमृत अलोकच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर व्हेरीटास संघाने अॅटॉस्‌ संघाचा 1 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना व्हेरीटास संघाने अॅटॉस्‌ संघाला 20 षटकात 7 बाद 123 धावांत रोखले. 123 धावांचे लक्ष देव रॉबीन चौधरीच्या 25 व अमृत अलोकच्या 36 धावांसह व्हेरीटास संघाने 18.4 षटकात 9 बाद 127 धावा करून पुर्ण करत विजय मिळवला.अमृत अलोक सामनावीर ठरला.

पीवायसी हिंदू जिमखाना क्रिकेट मौदानावर पार पडलेल्या लढतीत विक्रांत बांगेरच्या आक्रमक फलंदाजीच्या बळावर कॅपजेमिनि संघाने बीएमसी सॉफ्टवेअर संघाचा 73 धावांनी दणदणीत पराभव केला. पहिल्यांदा खेळताना कॅपजेमिनि संघाने 20 षटकात 4 बाद 204 धावांचा डोंगर रचला. गिरिष बोराने 61 चेंडूत 72 धावा व विक्रांत बांगेरने 39 चेंडूत 75 धावा करून संघाचा डाव बळकट केला. 204 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बीएमसी सॉफ्टवेअर संघ 20 षटकात 4 बाद 133 धावांत गारद झाला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी
अॅटॉस्‌- 20 षटकात 7 बाद 123 धावा(संदिप भागवत 25(28), महेश भोसले 27(19), सुमित दिघे 2-17) पराभूत वि व्हेरीटास- 18.4 षटकात 9 बाद 127 धावा(देव रॉबीन चौधरी 25(26), अमृत अलोक 36(21), हर्षल तिडके 2-23, रुपेश खिराड 2-19) सामनावीर- अमृत अलोक
व्हेरीटास संघाने 1 गडी राखून सामना जिंकला.

कॅपजेमिनि – 20 षटकात 4 बाद 204 धावा(गिरिष बोरा 72(61), विक्रांत बांगेर 75(39), किरण कुडलिंगर 2-35) वि.वि बीएमसी सॉफ्टवेअर- 20 षटकात 4 बाद 133 धावा(धिरज धुत 46(56), किरण कुडलिंगर 43(36), फनिंद्र पाईला 2-18) सामनावीर- विक्रांत बांगेर
कॅपजेमिनि संघाने 73 धावांनी सामना जिंकला.