आयटीएफ कुमार टेनिस स्पर्धेत प्रेरणा विचारे, गार्गी पवार, विपाशा मेहरा यांचा मुख्य फेरीत प्रवेश

पुणे: डेक्कन जिमखाना यांच्या तर्फे आयोजित व आयटीएफ, महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)आणि पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या गद्रे मरिन-एमएसएलटीए आयटीएफ कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या गटात प्रेरणा विचारे, गार्गी पवार, विपाशा मेहरा यांनी, तर मुलांच्या गटात संजीत देवीनेनी, फैज नस्याम, सुहित रेड्डी लंका या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून मुख्य फेरीत प्रवेश केला.

डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट,येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत अंतिम पात्रता फेरीत मुलींच्या गटात सातव्या मानांकित प्रेरणा विचारे हिने अव्वल मानांकित सराह देवचा 6-0, 6-1असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली. आठव्या मानांकित गार्गी पवारने तिसऱ्या मानांकित सुदिप्ता कुमारचा 6-2, 6-2असा पराभव करून मुख्य फेरी गाठली. बिगरमानांकित जगमीत कौर ग्रेवालने सहाव्या मानांकित सृजना रायरालाचा 6-2, 6-1असा सहज पराभव केला.

मुलांच्या गटात अव्वल मानांकित संजीत देवीनेनीने अनर्घ गांगुलीला 6-0, 6-1असे पराभूत केले. दुसऱ्या मानांकित फैज नस्याम याने प्रभजीत चंढोकचा 6-4, 6-2असा पराभव करून मुख्य फेरीत धडक मारली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम पात्रता फेरी:

संजीत देवीनेनी(भारत)(1)वि.वि.अनर्घ गांगुली(भारत)6-0, 6-1;

फैज नस्याम(भारत)(2)वि.वि.प्रभजीत चंढोक(भारत)6-4, 6-2;

सुहित रेड्डी लंका(भारत)(5)वि.वि.सर्वेश बिरमाणे(भारत)6-3, 6-4;

कार्तिक सक्सेना(भारत)(4)वि.वि.सिद्धार्थ जडली(भारत)6-1, 7-6(5);

मुली:

प्रेरणा विचारे(भारत)(7)वि.वि.सराह देव(भारत)(1)6-0, 6-1;

जगमीत कौर ग्रेवाल(भारत)वि.वि.सृजना रायराला(भारत)(6)6-2, 6-1;

गार्गी पवार(भारत)(8)वि.वि. सुदिप्ता कुमार(भारत)(3)6-2, 6-2;

विपाशा मेहरा(भारत)(4)वि.वि.मालविका शुक्ला(भारत)(5)6-3, 6-4.