विदर्भाने घडवला इतिहास, केले हे खास विक्रम

आज ८४वर्षांचा इतिहास असणाऱ्या रणजी ट्रॉफी इतिहासात प्रथमच विदर्भ रणजी संघाला प्रथमच विजेतेपद जिंकता आले आहे. या संघाला आजपर्यंत स्पर्धेच्या इतिहासात कधी अंतिम सामन्यांपर्यंतही मजल मारता नव्हती आली त्या संघाने आज ही स्पर्धा जिंकली.

दिल्ली संघाविरुद्ध एकवेळ पहिल्या डावात आघाडी घेण्यासाठी झगडत असलेल्या विदर्भाने त्याच संघाला ९ विकेट्सने पराभूत केले. यात विदर्भाच्या मधल्या फळीचा मोठा वाटा राहिला.

या विजयाबरोबर विदर्भ रणजी संघाने केलेलं विक्रम

१. वासिम जाफर हा ९व्यांदा रणजी विजेत्या संघाचा भाग राहिला आहे. परंतु त्याने आजपर्यंत पहिल्यांदाच विजयी धाव घेतली.

२. मुंबई आणि महाराष्ट्रापाठोपाठ रणजी ट्रॉफी जिंकण्याचा विक्रम विदर्भ संघाने केला आहे.