रणजी ट्रॉफी: विदर्भचा उपांत्य फेरीत प्रवेश, केरळविरुद्ध मोठा विजय !

सुरत। येथील लालभाई कॉन्ट्रॅक्टर स्टेडिअमवर पार पडलेल्या केरळ विरुद्ध विदर्भ उपांत्यपूर्व रणजी सामन्यात विदर्भाने आज केरळवर ४१२ धावांनी विजय मिळवला आहे. आदित्य सरवटेने विदर्भाकडून ६ बळी मिळवत महत्वाची कामगिरी बजावली.

केरळकडून दुसऱ्या डावात सलमान मिर्झाने अर्धशतकी खेळी केली. परंतु त्याच्या १०४ चेंडूत ६४ धावांच्या खेळीला बाकीच्या फलंदाजांकडून हवी तशी साथ मिळाली नाही. केरळकडून मोहम्मद अझरुद्दीन (२८),संजू सॅमसॅन (१८),सचिन बेबी(२६) आणि रोहन प्रेम(१३*) यांनी दोन आकडी धावसंख्या पार केली बाकीच्या फलंदाजांना दोन आकडी धावसंख्याही पार करता आली नाही. केरळने दुसऱ्या डावात १६५ च धावा केल्या.

विदर्भाकडून आदित्य सरवटे(६),रजनीश गुरबानी(२), कर्ण शर्मा(१) आणि अक्षय वखारे(१) यांनी बळी घेतले.

तत्पूर्वी विदर्भाने दुसरा डाव ९ बाद ५०७ धावांवर घोषित केला होता. त्यांच्याकडून फेज फेझल(११९) आणि अपूर्व वानखेडेने(१०७) शतकी खेळी केली. तर वासिम जफर (५८), गणेश सतीश(६५) आणि अक्षय विनोद वाडकर(६७*) यांनी अर्धशतकी खेळी केली होती.

संक्षिप्त धावफलक:

विदर्भ पहिला डाव:सर्वबाद २४६ धावा
केरळ पहिला डाव:सर्वबाद १७६ धावा
विदर्भ दुसरा डाव: ९ बाद ५०७ धावा (घोषित)
केरळ दुसरा डाव:सर्वबाद १६५ धावा

सामनावीर:रजनीश गुरबानी