असा झेल आपण यापूर्वी कधीही पहिला नसेल

आजकाल क्रिकेट हे अतिशय झटपट झालं आहे. खेळाडूंचं धावा घेण्याचं कौशल्य, क्षेत्ररक्षण किंवा गोलंदाजी. रवींद्र जडेजा सारखे खेळाडू तर मैदानाच्या कोणत्याही कोपऱ्यातून एवढा अचूक थ्रो फेकतात की तो बरोबर यष्टींचा वेध घेतो.

परंतु काही दिवसांपूर्वी इंग्लंडमध्ये अशी एक गोष्ट झाली की आपण त्यावर विश्वास ठेवणार नाही. इंग्लंडचा कसोटी कर्णधार अॅलिस्टर कूकने ज्या बाजूला उभा होता त्याच्या अगदी विरुद्ध बाजूने त्याने अविश्वसनीय असा काही झेल घेतला.

त्या विडिओ मध्ये स्पष्ट दिसतंय की इंग्लंडचा कर्णधार हा मुलाखत देण्यात व्यस्त असताना सराव सुरु असणाऱ्या बाजूने अचानक चेंडू कूकच्या बाजूला आला. मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीच्या बाजूला येणारा चेंडू त्या व्यक्तीला लागणार तेवढ्यात त्याने त्याचा झेल पकडला.

पहा: