Video: ॲशेसच्या मालिकेतील सामन्यात आला जोराचा वारा आणि मग जे घडले ते पाहून कुणालाही हसू लपवता आले नाही!

पर्थ । आज ॲशेसच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्याला पाऊसामुळे उशिरा सुरुवात झाली. मैदानात पाउसाबरॊबर वारा आणि हलकीशी बर्फवृष्टीही झाली.

या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघ आघडीवर होता आणि विजयाची औपचारिकता बाकी होती. मैदानावर सकाळी आलेल्या या नैसर्गिक संकटानंतर ग्राउंड स्टाफ परिस्थिती पूर्ववत करून सामना सुरु होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत होते.

अगदी ड्रायरने मैदान सुकवण्यासाठी प्रयत्न केला जात होता. यावेळी खेळपट्टीवर जे कव्हर ठेवले होते ते अचानक जोराच्या हवेने उंच उडाले. यावेळी त्या कव्हरच्या दुसऱ्या बाजूला असलेला कर्मचारीही दुसऱ्या बाजूला कव्हर बरोबर ढकलला गेला आणि जोरात खाली पडला.

यावेळी समालोचन कक्षात असणाऱ्या समालोचनकांनाही जोरजोरात हसू आले. परंतु तो कर्मचारी ठीक असलयाचे त्यांनी परत सांगितले.