Video: तीच स्पर्धा, तोच गोलंदाज आणि तसाच बाउंसर; झाली फिलिप ह्यूजेसची आठवण

मुंबई | सीन एबॉट या गोलंदाजाच्या एका खतरनाक बाउंसरने डोक्याचा वेध घेतल्यामुळे फिलिप ह्यूज या अाॅस्ट्रेलियाच्या प्रतिभावान खेळाडूला आपले प्राण गमवावे लागले होते. पुन्हा एकदा तसचं काहीस दृश्य पहायला मि्ळालं. 

यामुळे मात्र क्रिकेट प्रेमींच्या हृदयाचा ठोका मात्र चुकला. 

शेफील्ड शील्ड स्पर्धेत न्यू साउथ वेल्सकडून गोलंदाजी करणाऱ्या सीन एबॉटच्याच चेंडूवर  विक्टोरियाचा फलंदाज विल पुकोस्की खेळपट्टीवरच कोसळला. 

अतिशय खतरनाक अशा बाउंसरने विल पुकोस्कीच्या हेल्मेटचा वेध घेतला. त्यामुळे काही कळायच्या आतच विल पुकोस्की खेळपट्टीवर खाली बसला. 

यामुळे मैदानावरील खेळाडूंसह प्रेक्षकही चांगलेच घाबरले होते. 

चेंडू लागल्यावर विल पुकोस्की बराच वेळ खेळपट्टीवरच तसाच पडून राहीला. 

फिलिप ह्यूजला याच स्पर्धेत ४ वर्षांपुर्वी सीन एबॉटच्याच गोलंदाजीवर चेंडू लागल्यामुळे आपले प्राण गमवावे लागले होते. 

Video: