Video: अखेर वाॅर्नर-डीकाॅक वादाचे सीसीटीव्ही फुटेज बाहेर

दक्षिण अाफ्रिका विरुद्ध आॅस्टेलिया पहिल्या कसोटी सामन्यात वाॅर्नर-डीकाॅक वादाचे सीसीटीव्ही फुटेज बाहेर आता बाहेर आले आहे. चहापानाला जेव्हा संघ ड्रेसिंग रुम मध्ये जात होता तेव्हा त्या दोघात जे वाद झाले त्याचा हा विडीओ आहे. 

माध्यमातील काही वृत्तानुसार दक्षिण अाफ्रिकेच्या क्वींटन डीकाॅकने आॅस्टेलियाच्या डेवीड वाॅर्नरच्या पत्नीवर केलेल्या कमेंटमुळे हे वाद वाढले आहेत. 

याबद्दल आॅस्टेलियाचा कर्णधार स्टीव स्मिथनेही अशीच काहीशी प्रतिक्रीया देताना डेवीड वाॅर्नरची एकप्रकारे पाठराखण केली आहे. 

क्वींटन डीकाॅक हा जरा जास्तच वैयक्तिक टिपण्णी करत होता तर आमच्याकडून असे काहीही झाले नसल्याचे मत त्याने व्यक्त केले आहे. 

याबद्दल आॅस्टेलियाचा माजी कर्णधार अॅडम गिलख्रिस्टनेही नाराजगी व्यक्त केली आहे.

या घटनेचा आता सविस्तर विडीओ बाहेर आला असून त्यात आॅस्टेलियाचे खेळाडू वार्नरला थांबवताना दिसत आहेत. 

विडीओ: