Video- चक्क स्टेडियमच्या बाजूला क्रेन उभे करून त्या फूटबाॅल वेड्याने घेतला सामन्याचा आनंद

अली डेमिरकाया या चाहत्याने फूटबाॅलचा सामना पाहण्यासाठी चक्क भाड्याने क्रेन आणली. तसेच याच क्रेनच्या मदतीने उंचावर उभं राहून त्याने हा सामन्याचा आनंद घेतला.

त्याला टर्कीमधील एका मैदानावर १२ महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे त्याला त्याच्या आवडत्या टीमचा सामना पाहता येणार नव्हता.

Gaziantepspor आणि Denizlispor या दोन तुर्कीश फुटबॉल क्लब्समधे हा सामना पार पडला. अली डेमिरकाया हा Denizlispor क्लबचा चाहता आहे.

आपल्या आवडत्या संघाचा सामना मैदानावर जाऊन पाहता येणार नाही या विचाराने बैचेन झालेल्या अली डेमिरकायाने पैसे देऊन थेट क्रेनच भाड्याने घेतली. 

ही क्रेन मैदानाच्या बाजूला लावत त्यावरुन त्याने हा सामना पाहिला. 

तो जेव्हा हा सामना पहात होता तेव्हा मैदानातील अनेकांनी त्याची ही फॅनगिरी मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केली.

विशेष म्हणजे या सामन्यात अली डेमिरकायाचा आवडता क्लब असणाऱ्या Denizlisporने Gaziantepspor ५-० ने विजय मिळवला.

महत्त्वाच्या बातम्या –

अबब! विंबल्डनच्या बक्षिसांची रक्कम २०१८मध्ये तब्बल ३०० कोटी

पराभूत होऊनही मुंबईच्या हार्दिक पंड्या जिंकली सर्वांची मने

-म्हणून षटकार किंग युवराज दादाची कीट बॅग आवरायचा

भारताचे आयसीसी कसोटी क्रमवारीत मक्तेदारी कायम

-एकदिवस सौरव गांगुली होणार बंगालचा मुख्यमंत्री!