Video: मनिष पांडेने घेतला अफलातून झेल, पाकिस्तानच्या कर्णधाराची घेतली विकेट

दुबई। आज, 19 सप्टेंबरला भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना सुरु आहे. या सामन्यात मनिष पांडेने पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदचा बाउंड्री लाइनवर अफलातून झेल घेतला आहे.

या सामन्यात 25 व्या षटकात केदार जाधव गोलंदाजी करत होता. या षटकाच्या पाचव्या चेंडूवर त्याने लाँग आॅनला हवेतून फटका मारला. त्यावेळी बाउंड्री लाइच्या जवळ उभ्या असणारा मनिष पांडेने उजवीकडून पळत येउन हा चेंडू पकडला.

पण त्याचवेळी त्याला स्वत:ला सांभाळता न आल्याने त्याने चेंडू हवेत फेकुन बाउंड्री लाइनच्या बाहेर गेला आणि परत येऊन चेंडू फेकलेला चेंडू झेल पकडत सर्फराजला बाद केले. सर्फराजने या सामन्यात 12 चेंडूत 6 धावा केल्या.

मनिष या सामन्यात दुखापतग्रस्त झालेल्या हार्दिक पंड्याचा बदली क्षेत्ररक्षक म्हणून मैदानात आला होता. हार्दिकला 18 वे षटक टाकत असताना दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर नेण्यात आले.

त्याच्या दुखापतीबद्दल बीसीसीआयने सांगितले की “त्याला पाठीची दुखापत झाली असून त्याला उभे रहाता येत आहे. तसेच वैद्यकीय टीम त्याच्यावर उपचार करत आहे.”

या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यांची सुरुवात अडखळत झाली आहे. त्यांनी सुरुवातीच्या पाच षटकातच फकार जामन आणि इमाम उल हक या सलामीवीरांची विकेट गमावली होती. या दोघांनाही भुवनेश्वर कुमारने बाद केले.

पण त्यानंतर मलिक आणि बाबरने 82 धावांची भागीदारी रचली. मात्र हे दोघेही बाद झाल्यावर पाकिस्तानच्या फलंदाजांनी नियमित कालांतराने विकेट्स गमावल्या आहेत.

पाकिस्तानने भारताला 163 धावांचे आव्हान दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

एशिया कप २०१८: हार्दिक पंड्या दुखापतीमुळे मैदानाबाहेर; टीम इंडियाला मोठा धक्का

Video: टीम इंडियाने सामन्यानंतर हाँग काँगला दिली खास भेट

एशिया कप २०१८: शिखर धवनचा विक्रमांचा सिलसिला सुरूच