Video: धाव घेताना केएल राहुलचा निघाला शुज; बेन स्टोक्सने केली मदत

लंडन। भारताचा इंग्लंड विरुद्ध द ओव्हल मैदानावर पाचवा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी (8 सप्टेंबर) भारताचा सलामीवीर फलंदाज केएल राहुलच्या बाबतीत एक मजेशीर गोष्ट घडली आहे.

या सामन्यात दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडचा पहिला डाव 332 धावांवर संपुष्टात आणला. त्यानंतर भारतीय संघ फलंदाजीसाठी उतरला, पण दुसऱ्याच षटकात स्टुअर्ट ब्रॉडने शिखर धवनला बाद करत भारताला पहिला धक्का दिला.

यानंतर रुटने सहाव्या षटकात बेन स्टोक्सकडे गोलंदाजी करण्यासाठी चेंडू सोपावला. या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर राहुलने लेग साईडला चेंडू फटकावला आणि एक धाव घेण्यासाठी पळाला. याचवेळी धावायला सुरु करतानाच त्याचा शुज त्याच्या पायातून निघुन वरती उडाला.

शुज निघाल्याचे लक्षात आल्यानंतरही राहुलने ती धाव पूर्ण केली. ही धाव पूर्ण झाल्यानंतर स्टोक्सने राहुलचा शुज उचलून त्याची लेस त्याला सोडून देत मदत केली आणि त्याला तो परत केला.

या सामन्यात भारताने पहिल्या डावात सर्वबाद 292 धावा केल्या आहेत. भारताकडून अष्टपैलू रविंद्र जडेजा आणि हनुमा विहारीने अर्धशतक केले. तसेच इंग्लंडने पहिल्या डावात 40 धावांची आघाडी घेतली आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

अॅलिस्टर कूकला शेवटच्या कसोटीत संगकाराला मागे टाकत हा मोठा पराक्रम करण्याची संधी

पाचवी कसोटी: तिसरा दिवस फलंदाजांनी गाजवला; भारताकडून जडेजा, विहारीचे अर्धशतक

पदार्पणातच अर्धशतक करणारा हनुमा विहारी द्रविड, गांगुलीच्या यादीत सामील