व्हिडिओ व्हायरल- जेव्हा मेस्सी करतो कुत्र्यासोबत फूटबाॅलचा सराव

अर्जेंटीना आणि बार्सिलोना स्टार फुटबॉलपटू लियोनल मेस्सीचे कुत्राबरोबरचा फुटबॉल कौशल्यचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ त्याची पत्नी अँटोनला रोक्झूझोने पोस्ट केला आहे.

या व्हिडीओमध्ये, 31 वर्षीय मेस्सी हा त्याच्या हल्क नावाच्या कुत्र्यासोबत खेळत असून तो हल्कला कशाप्रकारे बॉलच्या जवळ येण्यापासून रोखत आहे हे आहे.

तर त्याच्या मुलांचा आवाजही या व्हिडिओमध्ये ऐकायला येतो. त्यातील एक म्हणत आहे की, ‘हल्क खूप चांगला खेळत आहे’. तर दुसरा म्हणत आहे की,’हो ते खरे आहे, पण पप्पाच उत्तम आहेत.’

मेस्सीने २०१६ च्या कोपा अमेरिका स्पर्धेनंतरच आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली होती. तसेच फिफा विश्वचषकातून अर्जेंटीना हा बाद फेरीतूनच बाहेर पडला. यामुळे तो संघातून निवृत्ती घेणार का यावर चर्चा होत होती.

मात्र अर्जेंटीना फुटबॉल असोसिएशनचे (एएफए) अध्यक्ष क्लाउडियो टॅपिया यांनी मेस्सीच्या निवृत्तीच्या चर्चेला पुर्णविराम दिला आहे.

सध्या मेस्सी हा कुटुंबासोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

रशियात झालेल्या फिफा विश्वचषकातील 4 सामन्यात त्याने एक गोल केला. त्याने 128 आंतरराष्ट्रीय सामन्यात 65 गोल केले आहेत. तसेच तो पाच बॅलोन दी ओर पुरस्काराचा विजेता आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या-

पॉल पोग्बा याने त्याचे विश्वविजेतेपदाचे गोल्ड मेडल दिले या व्यक्तीला

मोठी बातमी- संयुक्त राष्ट्राचे प्रमाणपत्र मिळवणारा हा ठरला पहिलाच फुटबॉल क्लब