Video: छे बॉल समझने में निकल जायेगा इसको! स्टंपमागील धोनी वाणी !

डर्बन । भारतीय संघाचा कर्णधार जरी विराट कोहली असला तरी माजी कर्णधार एमएस धोनी बहुतेकवेळा मर्यादित षटकांत गोलंदाजांना मार्गदर्शन करतो. त्याने फिरकी गोलंदाजांना केलेले मार्गदर्शन हा तर क्रिकेटप्रेमींमध्ये चर्चेचा विषय असतो.

धोनीचे आजपर्यंत गोलंदाजांबरोबर संभाषणाचे अनेक विडिओ आजपर्यंत समोर आले आहे. धोनी जेव्हा समोरील फलंदाज इंग्रजी भाषा बोलणार असतो तेव्हा भारतीय गोलंदाजांबरोबर हिंदी भाषेत संभाषण करतो तर सामना पाकिस्तान. श्रीलंका किंवा बांगलादेश बरोबर असेल तर बऱ्याच वेळा इंग्रजी भाषेत संभाषण करताना दिसला आहे.

धोनीच्या ह्याच वेगेवगेळ्या परिस्थितीमधील संभाषणाची एक खास रेकॉर्ड बनवून जरी नवोदित फिरकी गोलंदाज किंवा यष्टिरक्षकांना ऐकवली तरी ते एक मोठे विद्यापीठ ठरेल अशा त्या खास रेकॉर्डिंग आहेत.

असे असले तरी धोनीनेच याची एकदा तक्रार केली होती की जेव्हा भारतीय संघ क्षेत्ररक्षण करत असतो तेव्हा स्टंपजवळील माईकचा आवाज हा थोडा जास्तच ठेवला जातो त्यामुळे आमच्या योजना ह्या जगासमोर येतात.

परवा भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका डर्बन वनडेत देखील धोनीचे गोलंदाजांबरोबरचे हे संभाषण सतत ऐकू येत होते. त्यात धोनी हार्दिक पंड्या, युझवेन्द्र चहल आणि कुलदीप यादवला सतत मार्गदर्शन करताना दिसला. विशेष म्हणजे तो वेळोवेळी कर्णधार कोहलीच्या क्षेत्ररक्षणालाही दाद देत होता.

सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कुलदीप यादवने धोनीचे कौतूक करताना तो फिरकी गोलंदाजांचे ५०% काम कमी करतो असे सांगितले. धोनीच्या ह्याच अनुभवाचा संघाला मोठा फ़ायदा सध्या होताना दिसतो.

पहा हा संपूर्ण विडिओ: