- Advertisement -

Video: गोलंदाजांच्या डोक्यावर टप्पा पडून चेंडू सीमारेषेबाहेर

0 625

-आदित्य गुंड
न्यूझीलंडमध्ये ऑकलंड आणि कँटरबरी या संघांमध्ये झालेल्या क्रिकेट सामन्यात आज एक विचित्र घटना घडली. फोर्ड चषकामध्ये या दोन संघात झालेल्या सामन्यात जीत रावल या फलंदाजाने चेंडू इतक्या जोरात मारला की तो गोलंदाज अँड्र्यू एलीस याच्या डोक्यावर लागून सीमारेषेबाहेर गेला.

ही घटना सामन्याच्या १९ व्या षटकादरम्यान घडली.पंचांनी सुरुवातीला चौकार घोषित केल्यानंतर आपला निर्णय बदलत ऑकलंड संघाला सहा धावा बहाल केल्या.

एलीसला या घटनेनंतर मैदान सोडावे लागले.डोक्यावर चेंडू लागल्यामुळे त्याच्या डोक्याचा स्कॅन करावा लागला. डॉक्टरांनी सगळे काही आलबेल असल्याचा निर्वाळा दिल्यानंतर एलीसने पुन्हा मैदानावर येत गोलंदाजी केली.

त्याने टाकलेल्या ७ षटकात ५२ धावा देत २ गडी बाद केले. या दोन गड्यांमध्ये जीत रावलचाही समावेश होता हे विशेष.मात्र त्याचे हे प्रयत्न आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत.कँटरबरी संघ १०७ धावांनी पराभूत झाला.

Video-

Comments
Loading...
%d bloggers like this: