आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २१ हजार धावा करणारा खेळाडूच झालाय मुलाचा कोच

श्रीलंकेचा माजी कर्णधार सनथ जयसुर्याने बुधवारी (25 जुलै) त्याचा मुलगा रेनुकचा फलंदाजी सराव करतानाचा व्हिडिओ फेसबुकवर शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये जयसुर्या त्याच्या मुलाला नेटमध्ये गोलंदाजी करत आहे. तसेच या व्हिडिओत दिसते की जयसुर्याप्रमाणेच त्याचा मुलगाही डाव्या हाताने फलंदाजी करत असून तो वेगवेगळे शॉट खेळत आहे.

त्याचबरोबर एकदा असेही दिसते की त्याला मारता न अलेल्या चेंडूवर त्याचा शॉट तो तपासत आहे. जयसुर्याने त्याला वेगवेगळ्या लेंथने गोलंदाजी केली. त्याच्या मुलानेही त्या प्रत्येक चेंडूवर खेळण्याचा उत्तम प्रयत्न केला आहे.

जयसुर्याच्या या व्हिडिओवर अनेक चाहत्यांनीही त्याचे कौतुक केले आहे.

जयसुर्या हा श्रीलंकेचा अष्टपैलू होता. तो 1996 च्या विश्वचषक विजेत्या श्रीलंका संघाचा भागही होता.

त्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 110 कसोटी सामने खेळले असून यात त्याने 40.07 च्या सरासरीने 6973 धावा केल्या आहेत. तसेच 98 विकेटही घेतल्या आहेत.

याबरोबरच जयसुर्याने 445 वनडे सामने खेळताना 28 शतके आणि 68 अर्धशतकांसह 32.36 च्या सरासरीने 13430 धावा केल्या आहेत. तो वनडेत सर्वाधिक धावा करणारा जगातील चौथ्या क्रमांकाचा फलंदाज आहे. तसेच वनडेत त्याने 323 विकेटही घेतल्या आहेत.

जयसुर्याने निवृत्ती घेतल्यानंतर श्रीलंकेच्या निवड समीतीतही काम केले. मात्र भारताने श्रीलंकेला मायदेशातच सलग 9 सामन्यात पराभूत केल्यानंतर त्याने निवड समीतीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

संपुर्ण वेळापत्रक- टीम इंडियाच्या न्यूझीलंड दौऱ्याचे वेळापत्रक घोषीत

आम्ही या मैदानावर किंग आहोत, टीम इंडियाने पराभूत कण्याचा विचारही करु नये

अॅलिस्टर कुक म्हणतो, यामुळेच भारतीय संघ अव्वल स्थानी