कोहलीबरोबरचा हा किस्सा आहे वर्षातील सर्वात्तम, पहा व्हिडीओ

मेलबर्न। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर तिसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने दुसऱ्या दिवशी(27 डिसेंबर) 443 धावांवर पहिला डाव घोषित केला. भारताकडून या डावात चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली सर्वोत्तम 170 धावांची भागीदारी केली.

हे दोघे फलंदाजी करत असताना एक मजेदार घटना घडली. झाले असे की, भारताच्या पहिल्या डावातील 120वे षटक चालू असताना कोहलीने पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर लेग साइडला फ्लिकचा फटका मारला.

त्यावेळी धावा घेण्यासाठी पुजारा आणि कोहली धावत होते. या दोघांनी तीन धावा पूर्ण केल्या पण कोहली चौथी धाव घेण्यासाठीही इच्छित होता. मात्र यासाठी पुजाराने नकार दिला.

पुजाराने तिसरी धावही अडखळत पूर्ण केली होती. तर कोहली केव्हाच तिसरी धाव घेऊन चौथी धाव घेण्याच्या तयारीत थांबला होता. पण पुजारा यासाठी नाही म्हटल्याने या चेंडूवर 3 धावा निघाल्या.

धावा घेण्यासाठी धावताना कोहली नेहमीच चपळ असतो पण पुजाराची बऱ्याचदा धावा घेताना धावण्याची गती कमी असते. त्यामुळे ही मजेदार गोष्ट या दोघांमध्ये घडली. यावर समालोचकांनाही हसू आवरता आले नाही. तसेच चाहत्यांनीही यावर सोशल मीडियातून अनेक गमतीशीर कमेंट्स केल्या आहेत.

कोहली नेहमीच त्याच्या फिटनेसमुळे चर्चेत असतो. त्याचा हा फिटनेस यावेळीही दिसून आला आहे.

या सामन्यात पुजाराने 106 धावांची शतकी खेळी केली आहे. तर कोहलीने 82, मयंक अगरवालने 76 आणि रोहित शर्माने नाबाद 63 धावांची अर्धशतकी खेळी केली.

महत्त्वाच्या बातम्या:

राजकोट बाॅय जड्डू संधी मिळताच टीम इंडियाकडून चमकला

३९ वर्षांपूर्वीच्या विक्रमाला जसप्रीत बुमराहकडून धक्का

टीम न्यूझीलंडची घोषणा, १० महिन्यांनी द्विशतकवीर खेळाडू करतोय पुनरागमन