Video : आज सचिन तेंडुलकरची ती इच्छा पूर्ण होणार

0 363

मुंबई । मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दत्तक घेतलेल्या डोंजा आज भेट देणार आहे. याबद्दल सचिनने एक ट्विट शेअर करून आपल्या भावना व्यक्त केल्या.

“मी डोंजा गाव दत्तक घेतल्यापासून नेहमी वाटत होतं की या गावी जावं. सगळ्या लोकांना भेटावं. त्यांच्याबरॊबर वेळ घालवावा. माझी इच्छा आज पूर्ण होत आहे. फार उत्सुकता वाटते आहे. आपण लवकरच भेटूया. ” असे सचिन आपल्या ट्विटमध्ये म्हणतो.

माजी क्रिकेटपटू व खासदार सचिन तेंडुलकर आदर्श सांसद ग्राम योजनेंतर्गत दत्तक घेतलेल्या परंडा तालुक्यातील डोंजा गावाला भेट देणार आहेत. मंगळवार १९ डिसेंबर रोजी डोंजा गावाला सचिन भेट देणार आहेत.

यावेळी सचिन गावातील विकासकामांच्या पाहणीसोबत गावकरी आणि विद्यार्थ्यांशी संवाद देखील साधणार आहेत. १६ नोव्हेंबर रोजी सचिन या गावाला भेट देणार होते. मात्र, काही कारणास्तव तो रद्द करण्यात आला होता.

केंद्र शासनाच्या वतीने सांसद आदर्श ग्राम योजना सुरू करण्यात आली असून या योजनेअंतर्गत खासदारांनी एक गाव दत्तक घेवून संबंधित गावाचा चौफेर विकास करणे अपेक्षित आहे. या योजनेअंतर्गत खासदार सचिन यांनी योजनेअंतर्गत डोंजा गाव दत्तक घेतले आहे.

Comments
Loading...
%d bloggers like this: