Video: शाहीद आफ्रिदीने घेतलेला हा अफलातून झेल क्रिकेटप्रेमींनी पहायलाच हवा

दुबई | काल पाकिस्तान सुपर लीगच्या दुसऱ्या कराची किंग्ज विरुद्ध कोटा ग्लॅडीएटर सामन्यात इमाद वसिमच्या कराची किंग्जने सर्फराज अहमदच्या कोटा ग्लॅडीएटरवर १९ धावांनी विजय मिळवला. 

या सामन्यात शाहीद आफ्रिदीने फलंदाजीत जरी चमक दाखवली नसली तरी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण यात चांगली कामगिरी केली.

१३व्या षटकात तर आफ्रिदीने घेतलेला झेल इतका प्रेक्षणीय होता की ३८वर्षीय घेतलाय की १८ वर्षाय आफ्रिदीने घेतलाय असे वाटत होते. 

उमर अमिन या फलंदाजाने सीमारेषेवर मारलेला चेंडू आफ्रिदीने प्रथम हवेत उंच उडी मारुन थांबवला. त्यानंतर त्याचा तोल जात आहे हे ध्यानात आल्यावर त्याने चेंडू पून्हा सीमारेषेच्या आत फेकला अाणि  सीमारेषेच्या आत येत अफलातुन झेल घेतला. 

गोलंदाजीतही त्याने ४ षटकांत २३ धावा देत १ विकेट घेतली. 

Video: