गरोदर सानिया मिर्झाचा टेनिस खेळताना व्हिडोओ व्हायरल

सानिया मिर्झाची छोटी बहिण अॅनमने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात गर्भवती टेनिसपटू सानिया मिर्झा आपल्या वडिलांच्या उपस्थितीत टेनिस खेळताना दिसत आहे.

“लवकरच आई बनणाऱ्या माझ्या बहीणीसोबत टेनिस खेळत आहे. तिला चांगले फटके मारण्यासाठी फिट ठेवत आहे. तिच्याबरोबर खेळण्यासाठी माझ्याकडे चांगले टेनिस कौशल्य असण्याची गरज आहे.” असे अनम मिर्झाने व्हिडिओला कॅप्शन दिले आहे.

सानियाचा विवाह काही वर्षांपुर्वी पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटर शोएब मलिकबरोबर झाला आहे. सध्या ती टेनिसपासून दुर आहे. तीने कोणत्याही स्पर्धेत गेल्या काही महिन्यात भाग घेतलेला नाही.

३१ वर्षीय सानियाकडे एकूण ६ ग्रॅंडस्लॅम असून त्यातील ३ मिश्र दुहेरीची तर ३ पुरुष दुहेरीची आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

-ज्येष्ठ क्रीडा पत्रकार प्रल्हाद सावंत अनंतात विलीन

-स्म्रीती मानधनाच्या यशात कर्णधार विराट कोहलीचा मोठा वाटा