Video: पहा श्रेयस अय्यरने असे केले शतक साजरे

मुंबई । काल मुंबई विरुद्ध तामिळनाडू रणजी सामन्यात पहिल्या डावाच्या आघाडीवर तामिळनाडू संघाला ३ गुण मिळाले. असे असले तरी या सामन्यात दोन्ही डावात जबदस्त कामगिरी करणाऱ्या श्रेयस अय्यरचे विशेष कौतुक झाले.

पहिल्या डावात चांगली खेळी करूनही श्रेयसला त्याचे शतकात रूपांतर करता आले नाही परंतु दुसऱ्या डावात त्याने १२४ चेंडूत १३८ धावांची दणदणीत खेळी केली.

या शतकी खेळी नंतर त्याने वेगळ्याच प्रकारे आपले हे शतक साजरे केले. त्याने शतक झाल्यावर खास डान्सकरून आपली ही खेळी साजरी केली. याचा विडिओ त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.

View this post on Instagram

🤙🏼🤙🏼

A post shared by Shreyas Iyer (@shreyas41) on

२३ वर्षीय श्रेयस मुंबईकडून तब्बल ४३ प्रथमश्रेणी सामने खेळला असून त्यात त्याने ५६च्या सरासरीने ३८६३ धावा केल्या आहेत. याच जोरावर या खेळाडूला भारतीय संघात न्यूजीलँडविरुद्धच्या टी२० संघात स्थान देण्यात आले आहे.