Video:असा झाला शिखर धवनचा वाढदिवस साजरा

दिल्ली । आज भारताचा सलामीवीर शिखर धवनचा ३२ वा वाढदिवस. शिखर सध्या कसोटी सामन्यात खेळत असल्यामुळे आज सामन्याच्या चौथ्या दिवशी खेळ संपल्यावर त्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

विशेष म्हणजे वाढदिवसाच्या दिवशी शिखर धवनने अर्धशतकी खेळी करताना प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ८००० तर कसोटी क्रिकेटमधल्या २००० धावा पूर्ण केल्या. यामुळे हा वाढदिवस साजरा करताना तो चांगलाच आनंदी दिसत होता.

याचा व्हिडिओ बीसीसीआयने ट्विटरवरून शेअर केला आहे. त्यात सलामीवीर मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारा शिखरला केक लावताना दिसत आहेत. यावेळी नेहमीप्रमाणे संघाचे फिजिओ पॅट्रिक फरहाट यांनाही संघातील खेळाडूंनी केक लावला.