Video: विराट कोहली आणि कंपनीने तीव्र उन्हापासून बचावासाठी घेतला ‘आईस बाथचा’ आनंद

विंडिज विरूद्धचा दुसरा कसोटी सामना जिंकत भारतीय संघाने मालिकाही 2-0 ने जिंकली. पण  सध्या आॅक्टोबर हिटचा सामना सर्वच भारतीयांना करावा लागत आहे. त्यातून भारतीय संघातील खेळाडू कसे सुटतील.

विंडिजविरूद्धचा सामना संपल्यानंतर थकलेल्या भारतीय खेळाडूंनी ‘आइस बाथ’ घेतला. यावर बीसीसीआयने एक ट्विट करत व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

“खूप वेळ उन्हात खेळून थकलेल्या खेळाडूंना पुन्हा उर्जा मिळण्यासाठी काही खेळाडूंनी आइस बाथ घेतला.” असे बीसीसीआयने आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.

“खूप उन झेलल्यानंतर शरीर थंंड होण्यासाठी खेळाडूंनी आइस बाथचा वापर केला आहे.” असे भारतीय संघाचे ट्रेनर शंकर बसू यांनी सांगितले.

“आइस बाथ हा खूप महत्वाचा आहे. खेळा़डूंच्या झिजलेल्या शरीराला पुर्नावस्था प्राप्त करण्यासाठी विवीध पर्याय उपलब्ध आहेत. त्यामधे आइस बाथचा समावेश आहे. काही खेळाडूंनी यापूर्वी आइस बाथ घेतलेला नव्हता. काही खेळाडूंना आइस बाथ आवडला आहे.” असेही बसूंनी सांगितले.
भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला आइस बाथ आवडला आहे. “जेव्हा तुम्ही 90 षटकं क्षेत्ररक्षण करता त्यावेळी आइस बाथने तुमच्या शरीरातील झिज भरून निघते. यामुळे शरीरातील तापमान संतुलित राहते. शरीरावर येणारा ताण देखील नाहीसा होतो.” असे मत अजिंक्य रहाणेने व्यक्त केले आहे.
महत्वाच्या बातम्या-