Video: वेगवान चेंडूवर विराटची झाली अशी अवस्था, पुढच्याच चेंडूवर काय झाले पहाच!

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या वनडेत कागिसो रबाडाचा एक चेंडू विराट कोहलीच्या पोटात चांगलाच लागला. या चेंडूमुळे तो चांगलाच विव्हळला. परंतु त्याच्या पुढच्याच चेंडूवर आपण मर्यादित षटकांतील दिग्गज का आहोत हे विराटने दाखवून दिले.

हा संपूर्ण किस्सा झाला तो ८व्या षटकात. जेव्हा या षटकाचा पाचवा चेंडू कागिसो रबाडाने टाकला तेव्हा तो चेंडू विराटला नीट खेळता आला नाही आणि तो त्याच्या पोटात लागला. विशेष म्हणजे तेव्हा विराट फलंदाजीला येऊन काहीच मिनिटे झाली होती.

परंतु याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर काहीसा असाच टाकलेला चेंडू विराटने सरळ सीमारेषेपार पाठवला. यामुळे संघाला ६ धावांचा फायदा झाला. पुढे जाऊन भारताने हा सामना ९ विकेट्स आणि १७७ चेंडू राखून जिंकला.

विडिओ: