Video: विराट कोहलीचा स्लेजींगचा विडीओ व्हायरल

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा त्याच्या आक्रमक स्वभावासाठी ओळखला जातो. संघ कोणताही असो विराट आपला आक्रमक खेळ बदलत नाही. 

सध्या सुरू असलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मालिकेतही विराटमध्ये कर्णधार आणि एक खेळाडू म्हणून सतत एक आक्रमकता दिसली.  त्याची ही आक्रमकता त्याचा बेंगलोरच्या आयपीएलमधील संघसहकारी एबी डीविलिअर्स विरुद्धही दिसून आली. 

एबी डीविलिअर्स जेव्हा बाद झाला तेव्हा विराटने जोरदार सेलिब्रेशन केले. 

याच सामन्यात विराट टाब्रेज शामसी या खेळाडूबरोबर वाद घालताना दिसला. विराटने या खेळाडूबरोबर चांगलेच स्लेज केले. 

याचाही विडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. 

 

मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना शुक्रवारी सेंच्युरीयनमध्ये होणार आहे.