Video: श्रेयस अय्यर घेतलेला हा झेल प्रत्येक क्रिकेटप्रेमीने पहायलाच हवा!

0 4,139

सेंच्युरियन। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका ६्व्या वनडे सामन्यात आज भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला सुरुवातीलाच दोन मोठे झटके बसले. 

सामन्यातील सुरुवातीच्या दोन्ही विकेट्स ह्या मुंबईकर शार्दल ठाकूरने घेतल्या. जेव्हा ७व्या षटकात हशिम अमलाला मुंबईकर शार्दल ठाकुरने एमएस धोनीकडे झेल द्यायला भाग पाडले तेव्हा धोनीचा हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हा ६००वा झेल होता. 

तर जेव्हा त्याने अॅडेन मार्रक्रमला बाद केले तेव्हा मार्रक्रमचा सुरेख झेल टिपण्याचे काम केले ते त्याचा मुंबईकर संघमित्र श्रेयस अय्यरने. १०व्या षटकातील ४थ्या चेंडूवर शार्दल ठाकूरच्या गोलंदाजीवर मार्रक्रमचा हा झेल श्रेयसने हवेत उंच सुर मारत घेतला. 

व्हिडीओ:

 

Comments
Loading...
%d bloggers like this: