१२वर्षाखालील फुटबॉल २०१८ स्पर्धेत विद्याभवन, विबग्योर, स्प्रिंग डेल स्कुल संघांची विजयी सलामी

पुणे । ग्रीनबॉक्स यांच्या तर्फे आयोजित ग्रीनबॉक्स आंतरशालेय 12वर्षाखालील फुटबॉल 2018 स्पर्धेत विद्याभवन स्कुल अ व ब, विबग्योर स्कुल अ व ब, स्प्रिंग डेल स्कुल अ या संघांनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून विजयी सलामी दिली.

कॅस्टल रॉयल, एबीआयएल कॅम्पस, रेंजहिल्स, भोसलेनगर येथील फुटबॉल मैदानावर आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत सलामीच्या लढतीत ऍरोन मेंडीस(2, 5,15मि.)याने केलेल्या तीन गोलांच्या जोरावर विद्या भवन स्कुल ब संघाने दस्तूर स्कुलचा 6-0असा धुव्वा उडविला. विद्या भवन स्कुल अ संघाने सिम्बायोसिस एसएससी ब संघाचा 3-0असा तर, विबग्योर स्कुल ब संघाने सिम्बायोसिस एसएससी अ संघाचा 4-0असा पराभव करून शानदार सुरुवात केली.

स्पर्धेत दस्तूर हायस्कुल, विद्याभवन स्कुल अ व ब संघ, सिम्बायोसिस एसएससी(एलसीआर) अ व ब संघ, विबग्योर स्कुल अ व ब, स्प्रिंग डेल स्कुल अ व ब संघ, एंजल हायस्कुल लोणी, जेएन पेटिट स्कुल अ व ब, एंजल हायस्कुल उरळी कांचन, आदित्य इंटरनॅशनल स्कुल, आर्यन स्कुल, सेंट व्हिन्सेंट हायस्कुल, हचिंग्ज हायस्कुल, द ऑर्चिड स्कुल, सीएम इंटरनॅशनल स्कुल, बिशप्स हायस्कुल(कॅम्प), माउंट सेंट पॅट्रिक स्कुल, डॉनबॉस्को हायस्कुल, सिम्बायोसिस इंटरनॅशनल स्कुल, इंदिरा नॅशनल स्कुल, कस्तुरबा गांधी स्कुल, बिशप्स कल्याणीनगर, पुणे पोलीस पब्लिक स्कुल, विद्यांचल स्कुल, एचईएम गुरुकुल स्कुल या संघांनी आपला सहभाग नोंदविला आहे.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली फेरी:
स्प्रिंगडेल स्कुल अ: 2(ईशान केमकर 14, 16मि.)वि.वि.आदित्य इंटरनॅशनल स्कुल: 1(पंकज चौधरी 19मि);
विबग्योर स्कुल अ: 2(शील घटानी 4मि., आयुश कटनकर 8मि.)वि.वि.स्प्रिंग डेल स्कुल ब: 1(पार्थ भरेकर 3मि.);
विबग्योर स्कुल ब: 4(आदित्य गोयल 2मि., वैभव राजेश 3, 18मि., सिद्धांत आडमुठे 15मि.)वि.वि.सिम्बायोसिस एसएससी अ: 0;
विद्या भवन स्कुल ब: 6(ऍरोन मेंडीस 2, 5,15मि., आदित्य धुमाळ 9मि., अंकित गवारे 20मि., ओम राक्षे 21मि.)वि.वि.दस्तूर स्कुल: 0;
विद्या भवन स्कुल अ: 3(आदित्य पिल्लई 3मि., नील दगडे 7, 16मि.)वि.वि.सिम्बायोसिस एसएससी ब: 0;