केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनीच केली स्वच्छतागृहाची सफाई

केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल सध्या भारतात होणाऱ्या अंडर १७ विश्वचषकाच्या तयारीकडे जातीने लक्ष देत आहेत. कधी सुरु असलेली कामे पाहून आनंद तर कधी नजरंगी ते प्रकट करत आहेत. ही स्पर्धा स्वप्नवत होण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. तरीही काही बारीक-सारीक गोष्टींमुळे येणाऱ्या पाहुण्यांना कोणताही त्रास नको म्हणून क्रीडामंत्री सर्व मैदाने स्वतः फिरत आहेत.

गेल्या आठवड्यात त्यांनी इंदिरा गांधी स्टेडियमला भेट देऊन तेथील स्वच्छतागृहांची अचानक पाहणी केली तेव्हा ती अतिशय अस्वच्छ असल्याचे दिसताच स्वतःच साफसफाईला सुरवात केली. कांही दिवसांपूर्वी येथे कुस्ती स्पर्धा झाल्या होत्या व त्यात आंतरराष्ट्रीय पैलवानही सहभागी झाले होते. त्यावेळी स्वच्छतागृहे घाणेरडी असल्याच्या तक्रारी केल्या गेल्या होत्या.

क्रीडामंत्र्यांनी याची दाखल घेत मैदानाला भेट दिली. त्यावेळी स्वच्छतागृहांबाहेर टिश्यू पेपरचे बोळे पडल्याचे दिसताच त्यांनी स्वतः टिशू पेपर उचलायला सुरुवात केली. तसेच बरोबर असलेल्या दिल्लीकर युवा क्रिकेटपटूंना मदत करायला सांगितली. यावेळी त्यांनी मैदानातील अन्य विभागांनाही भेटी दिल्या. त्यात त्यांनी मुले व मुलींच्या हॉस्टेल तसेच जिमनॅस्टिक हॉल, बॉक्सिंग हॉलची पाहणी केली.