टीम इंडियाकडून खेळलेल्या खेळाडूचे पंचासोबत भांडण, तब्बल २० मिनीटं थांबवला सामना

दिल्ली | विजय हजारे ट्राॅफीमध्ये मध्यप्रदेश आणि दिल्ली यांच्या दम्यानच्या सामन्यात मध्यप्रदेशचा विकेट किपर कर्णधार नमन ओझाने पंचासोबत गैरवर्तन केले आहे. त्यामुळे या  सामन्यात 20 मिनीट व्यत्यय आला होता.

ग्रुप ब मधील या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना मध्यप्रदेशच्या संघासमोर 284 धावांचे लक्ष ठेवले होते. मधल्या फळीतील फलंदाज नितीश राणाने 98 चेंडूत 107 धावांची शानदार खेळी केली.

कर्णधाराच्या रागाने आधीच चर्चेत असलेल्या मध्यप्रदेशच्या संघाचा डाव 42.4 षटकात 209 धावांवर आटोपला. दिल्लीचा पार्टटाइम फिरकी गोलंदाज ललित यादवने 25 धावा मध्यप्रदेशचे 5 गडी बाद केले.

सामन्यातील 28 व्या षटकात डावखुरा फलंदाज नितीश राणा 26 धावांवर खेळत होता. रमीज खानच्या गोलंदाजीवर स्वीप फटका डीप मिडवेटला मारला. तेथे असलेल्या क्षेत्ररक्षाकाने त्याचा झेल घेतला. मध्यप्रदेशच्या खेळाडूंनी जल्लोष सुरु केला.

राणा अजून मैदानातच होता. पंच राजीव गोदरा यांना तो झेल संशयास्पद वाटला. त्यांनी मैदानातील दुसरे पंच नवदीप सिंगसोबत चर्चाकरून निर्णय तिसऱ्या पंचाकडे दिला. तिसऱ्या पंचानी राणाला नाबाद ठरवले.

त्यानंतर रागाच्या भरात नमन ओझाने पंच गोदरायांच्याकडे बाेट दाखवत विचित्र वर्तन केले. तसेच काही प्रश्नही विचारले.

त्यानंतर मॅच रेफ्री नितीन गोयल मैदानात गेले. त्यामुळे सामना 20 मिनीटे थांबवा लागला होता. ओझाच्या या कृत्यामुळे त्याच्यावर कडक कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यासंबधीचा अहवाल गोयल यांनी जमा केल्याचे समजते.

त्यानंतर राणाने शानदार शतक झळाकावत तिसऱ्या गड्यासाठी ध्रुव शौर्य (67)सोबत 147 धावांची भागिदारी  केली.

नमन ओझा भारताकडून १ कसोटी, १ वन-डे आणि २ टी२० सामने खेळला आहे. त्यात त्याने एकूण ६९ धावा केल्या आहेत.

धाव फलक थोडक्यात-

दिल्लीच्या 50 षटकात 284/8 (नितीश राणा 9 8 चेंडूत 107, मिहिर हिरवानी 4/49).

एमपी 42.4 षटकांत  209 (वेंकटेश अय्यर 53, ललित यादव 5/25).

दिल्ली 75 धावांनी विजयी.

महत्वाच्या बातम्या-