पृथ्वी शाॅ- श्रेयस अय्यरच्या फलंदाजीच्या जोरावर मुंबई विजय हजारे ट्राॅफीच्या अंतिम फेरीत

बेंगलोर | विजय हजारे ट्राॅफीच्या पहिल्या सेमिफायनलमध्ये मुंबईने हैद्राबादवर ६० धावांनी व्हिजेडी पद्धतीने विजय मिळवला. मुंबईकडून या विजयात पृथ्वी शाॅ, श्रेयस अय्यर यांनी फलंदाजीत तर तुषार देशपांडेने गोलंदाजीत चमकदार कामगिरी केली.

या सामन्यात नाणेफेक जिंकत हैद्राबादने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हैद्राबादकडून रोहित रायडूने १३२ चेंडूत १२१ धावांची नाबाद खेळी केली तर कर्णधार अंबाती रायडूला मात्र ११ धावांवर समाधान मानावे लागले. निर्धारीत ५० षटकांत हैद्राबादने ८ बाद २४६ धावांपर्यंत मजल मारली.

२४७ धावांचे लक्ष घेऊन मैदानात आलेल्या मुंबईकडून पृथ्वी शाॅ आणि रोहित शर्माने ७३ धावांची सलामी दिली. पृथ्वी शाॅने  मुंबईकडून सलामीला येताना त्याने हैद्राबादविरुद्ध बेंगलोरच्या चिन्नस्वामी स्टेडियमवर ४४ चेंडूत ६१ धावांची खेळी केली. त्यातील केवळ १७ धावा रोहितच्या होत्या. रोहित बाद झाल्यावर ९ धावांच्या अंतराने पृथ्वीही बाद झाला. परंतु त्याने आपल्या ६१ धावांच्या खेळीत तब्बल ८ चौकार आणि २ षटकारांची बरसात केली. त्याच्या याच खेळीमुळे मुंबईने ११.४ षटकांतच २ बाद ८२ अशी मजल मारली होती.

त्यानंतर श्रेयस अय्यरने नाबाद ५५ तर रहाणेने नाबाद १७ धावा केल्या. मुंबईला सध्या २५ षटकांत जिंकण्यासाठी ९२ धावांची गरज असताना पाऊस आल्यामुळे सामना थांबविण्यात आला. परंतु पावसाने विश्रांती न घेतल्यामुळे व्हीजेडी मेथडने मुंबईला ६० धावांनी विजयी घोषीत करण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या:

सचिन, धोनी प्रमाणेच कोहली करणार मायदेशात हा मोठा पराक्रम

पृथ्वी शॉला मिळू शकते रोहित शर्माबरोबर वनडेमध्ये फलंदाजी करण्याची संधी

सचिनचा हा ‘विराट’ रेकॉर्ड मोडण्याची कोहलीला संधी