तिसरी कसोटी: शतकी खेळी केल्यांनतर विजयने केले असे सेलिब्रेशन !

दिल्ली । येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात भारताचा सलामीवीर मुरली विजयने खणखणीत शतक केले आहे. मुरली विजयचे हे कसोटीमधील ११वे शतक आहे.

सध्या विजय १६९ चेंडूत १०१ धावांवर खेळत आहे. त्याने आपल्या शतकी खेळीत ९ चौकार मारले आहेत. सलग दुसऱ्या कसोटी डावात त्याने शतकी खेळी आहे. नागपूर कसोटीत त्याने शतकी खेळी केली होती.

२०१० नंतर एका कॅलेंडर वर्षात ३ किंवा त्यापेक्षा जास्त शतकी खेळी करणारा विजय हा केवळ पहिला भारतीय खेळाडू बनला आहे.

सद्यस्थितीत भारतीय संघ ५७ षटकांत २ बाद २४५ धावांवर खेळत असून कर्णधार विराट कोहली १०१ चेंडूत ९४ धावांवर खेळत आहे.

यावेळी विजयने खास शतकी सेलिब्रेशन केले. यापूर्वी असे सेलिब्रेशन मुंबईकर श्रेयस अय्यरने एका रणजी सामन्यात केले होते.