जेव्हा सुनील गावसकर विजय मल्ल्याला भेटतात…

भारतातील मोठमोठ्या बँकांची कर्ज बुडवून फरार झालेले उद्योगपती विजय मल्ल्या काल भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला हजर होते. यावेळी त्यांचे आणि भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांची चर्चा सुरु असल्याचे फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले.

या भेटीमुळे भारताच्या या महान फलंदाजाला नेटिझन्सच्या मोठ्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघाचे काही काळापूर्वी मालक असणारे मल्ल्या काही महिन्यापूर्वी तब्बल ९००० कोटी रुपयांचं कर्ज बुडवून भारतातून लंडन येथे फरारझाले होते.

गेले कित्येक दिवस या व्यक्तीच कुणाला दर्शन झालेलं नसताना आणि सामान्य भारतीयांपासून सर्वांमध्ये रोज चर्चेचा विषय असणारा मल्ल्या काल भारत पाकिस्तान सामन्याला व्हीआयपी स्टॅन्ड मध्ये बसल्याचा फोटो व्हायरल झाला आणि मोठ्या प्रमाणावर गहजब झाला.

त्यांनतर आणखी एक फोटो सोशल मेडियावर पहायला मिळाला. त्यात भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर आणि विजय मल्ल्या गुफ्तगू करताना दिसून आले.
मल्ल्यांना १८ एप्रिल रोजी स्कॉटलंड पोलीसने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते तसेच £६५०,००० रकमेवर त्यांची जमानत झाली होती.