विश्वचषक २०१९: टीम इंडियाला धक्का; हा महत्त्वाचा खेळाडू झाला दुखापग्रस्त

भारतीय संघ सध्या 2019 च्या विश्वचषकासाठी इंग्लंडमध्ये आहे. 30 मेपासून सुरु होणाऱ्या या विश्वचषकाआधी भारतीय संघ दोन सराव सामने खेळणार आहे. त्यातील एक सराव सामना आज(25 मे) न्यूझीलंड विरुद्ध होणार आहे. मात्र त्याआधीच भारताला एक धक्का बसला आहे.

भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू विजय शंकरला सरावा दरम्यान हाताला चेंडू लागल्याने दुखापत झाली आहे. काही रिपोर्ट्सच्या नुसार फलंदाजीचा सराव करत असताना पुलशॉट खेळण्याच्या प्रयत्नात शंकरला ही दुखापत झाली आहे. त्याला भारतीय संघाला नेटमध्ये सराव देण्यासाठी इंग्लंडला गेलेला वेगवान गोलंदाज खलील अहमदचा चेंडू लागला आहे.

मात्र अजून शंकरच्या या दुखापतीबद्दल बीसीसीआयने कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही.

शंकरला भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. तसेच त्याला या विश्वचषकासाठी भारतीय संघात अंबाती रायडू ऐवजी संधी देण्यात आल्याने त्याच्याबद्दल बरीच चर्चा झाली आहे. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.

पण त्याआधी त्याची दुखापत किती गंभीर आहे. तसेच तो न्यूझीलंड विरुद्धच्या सराव सामन्यात खेळणार का हे पहावे लागणार आहे.

त्याच्याबद्दल बीसीसीआयच्या एका सुत्राने पीटीआयला सांगितले की ‘शंकरचे सावधगिरी म्हणून स्कॅन करण्यात आले आहे. तसेच शनिवारच्या सराव सामन्यातील त्याच्या उपलब्धतेवर त्याचे स्कॅनचे रिपोर्ट आल्यानंतर निर्णय घेतला जाईल. हे रिपोर्ट शुक्रवारी संध्याकाळी किंवा शनिवारी सकाळी (लंडनच्या प्रमाणवेळेनुसार) येतील.’

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

या १० दिग्गज क्रिकेटपटूंना आजपर्यंत मिळवता आले नाही विश्वचषकाचे विजेतेपद

विश्वचषकात खेळणाऱ्या स्मिथ-वाॅर्नर जोडीबद्दल फिंचने केले मोठे वक्तव्य

विश्वचषक होतोय त्या देशात शतकी खेळी केल्यावर रहाणे म्हणाला…