विश्वचषक २०१९: एकाच दिवसात हे चार खेळाडू झाले दुखापतग्रस्त

24 मेपासून 2019 विश्वचषकासाठीच्या सराव सामन्यांना सुरुवात झाली आहे. या विश्वचषकाच्या मुख्य स्पर्धेला 30 मेपासून इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याने सुरुवात होणार आहे. मात्र त्याआधीच काल(24 मे) चार खेळाडूंना दुखापती झाल्या आहेत.

या खेळाडूंना झाल्या दुखापती – 

इयान मॉर्गन – इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गनच्या डाव्या हात्याच्या तर्जनीला फ्रॅक्चर झाले आहे. त्याला काल नेटमध्ये सराव करताना ही बोटाची दुखापत झाली आहे. या दुखापतीनंतर त्याला लगेचच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे त्याच्या बोटाचा एक्स-रे काढण्यात आला.

त्यामुळे आता बोट फ्रॅक्चर झाल्याने तो आज(25 मे) ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या सराव सामन्यात सहभागी होणार नाही. पण तो 30 मे ला दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या विश्वचषकातील सलामीच्या सामन्यापर्यंत पूर्ण बरा होईल अशी आशा इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने व्यक्त केली आहे.

अविष्का फर्नांन्डो – काल श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात पार पडलेल्या सराव सामन्यात श्रीलंकेचा फलंदाज अविष्का फर्नांन्डोला पायाच्या घोट्याची दुखापत झाली आहे. या सामन्यात फाफ डु प्लेसिसने मारलेला चेंडू आडवताना त्याला ही दुखापत झाली.

यानंतर त्याला स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर नेण्यात आले. नंतर त्याच्या पायाचे स्कॅन करण्यात आले. तसेच काही रिपोर्ट्सच्या नुसार त्याची दुखापत गंभीर नाही. यातून तो लवकरच बरा होईल.

शिखर धवन – भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनच्या हेल्मेटला काल फलंदाजीचा सराव करत असताना प्रशिक्षक संजय बांगर यांनी टाकलेला चेंडू लागला. पण त्याने हेल्मेट घातले असल्याने गंभीर दुखापत झाली नाही. परंतू त्याच्या ओठांना आणि जबड्याला थोडा मार लागला आहे.

पण या चेंडूनतंर लगेचच भारतीय संघाचे फिजिओ पॅट्रिक फऱ्हार्ट हे त्याच्या जवळ गेले. धवनही लगेचच ड्रेसिंग रुममध्ये परतला. धवनची ही दुखापत गंभीर नसल्याने तो आज(25 मे) न्यूझीलंड विरुद्ध सराव सामना खेळत आहे.

विजय शंकर – भारताच अष्टपैलू क्रिकेटपटू विजय शंकरलाही काल नेटमध्ये फलंदाजीचा सराव करत असताना हाताला चेंडू लागल्याने दुखापत झाली आहे. त्याला भारतीय संघाला नेटमध्ये सराव देण्यासाठी इंग्लंडला आलेला वेगवान गोलंदाज खलील अहमदचा चेंडू लागला आहे.

त्यामुळे लगेचच त्याच्या हाताचे स्कॅन करण्यात आले आहे. तसेच बीसीसीआयने त्याला कोणतेही फ्रॅक्चर नसल्याचे सांगितले असून त्याच्यावर संघाची वैद्यकीय टीम उपचार करत असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे त्याला आज(25 मे) न्यूझीलंड विरुद्धच्या सराव सामन्यासाठी भारतीय संघात स्थान देण्यात आलेले नाही.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

इंग्लंडच्या माजी कर्णधाराला अजूनही वाटते या दोन भारतीय क्रिकेटपटूंची भीती…

विश्वचषक २०१९: टीम इंडियाला धक्का; हा महत्त्वाचा खेळाडू झाला दुखापग्रस्त

या १० दिग्गज क्रिकेटपटूंना आजपर्यंत मिळवता आले नाही विश्वचषकाचे विजेतेपद