भारताकडून आज हा खेळाडूने केले आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण

कोलंबो। आज भारतीय संघातुन विजय शंकर खेळाडूला पदार्पणाची संधी मिळाली. त्याला प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी टी२० संघाची कॅप दिली. 

टी२० मध्ये भारताकडून खेळणारा तो ७४वा खेळाडू ठरणार आहे.

आज श्रीलंकेत तिरंगी टी २० मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेत भारत, श्रीलंका आणि बांग्लादेश संघ सामील होणार असून आज पहिला सामना श्रीलंका विरुद्ध भारत असा संध्याकाळी 7 वाजता होणार आहे.

ही मालिका श्रीलंकेच्या स्वातंत्र्याला ७० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने खेळवण्यात येणार असून निदाहास ट्रॉफी असे या मालिकेचे नाव आहे. निदाहासचा अर्थ सिंहली भाषेत स्वातंत्र्य असा होतो. त्यामुळे या तिरंगी मालिकेचे नाव निदाहास ठेवण्यात आले आहे.

 

कोण आहे हा विजय शंकर- 
विजय शंकर मधल्या फलित फलंदाजी करतो. २६ वर्षीय शंकर इंडिया अ संघाबरोबर दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला होता. त्याच्या महत्वपूर्ण ७२ धावांमुळे भारतीय संघ तिरंगी मालिकेत विजयी झाला होता. न्यूझीलँड संघाविरुद्ध इंडिया अकडून खेळताना त्याने फलंदाजीत महत्वपूर्ण योगदान दिले होते.

त्याने ३२ प्रथम श्रेणी सामन्यात १६७१ धावा तसेच २७ विकेट्स घेतल्या आहेत. या खेळाडूच्या चेन्नई येथील निवासस्थानी टेरेसवर इनडोअर सरावाची खेळपट्टी आहे. तेथे तो फलंदाजी आणि गोलंदाजीचा सराव करतो.