सचिन तेंडुलकर- विनोद कांबळी मैत्रीचे नवे पर्व

८ वर्षांपूर्वीचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि त्याचा लहानपणीचा मित्र विनोद कांबळी यांच्यातला दुरावा कमी झाला आहे. राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तक प्रकाशनावेळी हे दोघे एकत्र आले होते.

जेव्हा कांबळीची कारकीर्द २००९ला धोक्यात होती तेव्हा सचिनने मदत न केल्याने तो दुखावला गेला होता. तसेच सचिनने कांबळीला त्याच्या शेवटच्या आंतरराष्ट्रीय आणि आपल्या २०० व्या कसोटी सामन्यासाठी बोलावले नव्हते. त्याचबरोबर त्याने त्यादिवशी केलेल्या आपल्या भाषणात कांबळीचे नावही घेतले नाही.

याबाबतीत त्याने टाइम्स ऑफ इंडियाला सांगताना सांगितले “आमच्यात सगळं काही चांगलं आहे. मी आनंदी आहे. आम्ही एकमेकांना मिठीही मारली आणि आम्ही लोकांना सांगतो कि आम्ही परत आलोय।”

ते एकत्र आले हे लोकांना कळले ते कांबळीने केलेल्या अतुल कसबेकरच्या ट्विटला दिलेल्या उत्तरामुळे. कांबळीने ट्विटमध्ये लिहिले आहे की ” प्रिय अतुल तुला शिशिर , राजदीप सरदेसाई आणि सचिन तुम्हाला भेटून आनंद झाला. मास्टर ब्लास्टर माझं तुझ्यावर प्रेम आहे”

सचिन आणि कांबळी लहानपणी शारदाश्रम विद्यामंदिराकडून खेळायचे. तसेच त्यांनी ६६४ धावांची विक्रमी भागीदारीही केली होती. नंतर ते मुंबईसाठी आणि भारतीय संघातही एकत्र खेळले.