फिटनेसवरून विनोद कांबळीने उडवली प्रशिक्षक रवी शास्त्रींची टर!

भारताचा माजी फलंदाज विनोद कांबळीने आज भारतीय प्रशिक्षक रवी शास्त्रींना ट्विटरवर ट्रोल केले आहे. त्याने शास्त्रींच्या फिटनेसवर टीका केली आहे.

कांबळीने ट्विटरवर शास्त्रींचा एक फोटो शेयर केला आहे आणि लिहिले आहे, “या प्रशिक्षकाला खरंच फिटनेसची गरज आहे.” यावर ट्विटरकरांनी कांबळीला मिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी म्हटले आहे की शास्त्री हे वरिष्ठ खेळाडू आहेत त्यांना असे बोलू शकत नाही तर काहींनी कांबळीशी सहमती दर्शवली आहे.

सध्या सचिन तेंडुलकरशी जुने संबंध परत जुळल्याने कांबळी चांगलाच चर्चेत होता. सचिन आणि कांबळी लहानपणापासूनचे चांगले मित्र आहेत. त्यांनी एकत्र खेळताना अनेक चांगल्या भागीदाऱ्याही रचल्या आहेत. परंतु मधे सचिन आणि कांबळी यांचे संबंध बिघडल्याच्या चर्चा होत्या पण आता पुन्हा त्यांचे संबंध चांगले झाले आहे हे त्यांनी एकत्र असतानाचे फोटो शेयर केले आहे यावरून कळते.

शास्त्रींनीं जून २०१७ पासून भारतीय संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारले आहे. त्यांच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघाने पहिल्यांदाच कसोटी मालिका गमावली आहे. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पहिल्या दोन सामन्यात पराभव स्वीकारला आहे तर तिसरा सामना सध्या जोहान्सबर्ग सुरु आहे.

काहींनी कुंबळे उत्तम प्रशिक्षक होता असेही म्हटले आहे.